निःशुल्क व्यावसायिक भाषांतर अभ्यासक्रम
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपजत व कमावलेल्या भाषा-कौशल्यांचा वापर करून त्यांची रोजगारक्षमता वाढवणे हे उद्दिष्ट्य डोळ्यांसमोर ठेवून सीताराम म्हात्रे फाऊंडेशन निःशुल्क भाषांतर प्रशिक्षण वर्ग चालविते. त्यासाठी फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. चंद्रकांत काळुराम म्हात्रे ह्यांनी भाषांतर क्षेत्रातील त्यांच्या दशकभरातील आंतरराष्ट्रीय अनुभवाचा उपयोग करून Certificate in Computer Assisted Translation (C-CAT) हा अभ्यासक्रम तयार केला आहे. भाषांतरासंबंधी विविध कौशल्ये शिकविण्यासाठी प्रकल्प पद्धतीचे उपयोजन करणाऱ्या ह्या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेले कोणतेही अभ्यासकार्य कागदांच्या रद्दीची भर बनण्याऐवजी इंटरनेटवरील उपलब्ध ज्ञान-संसाधनांमध्ये भर घालते. त्यामुळे भाषांतरासंबंधी ही कौशल्ये आत्मसात करत असतानाच विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ तयार होतो ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतात. भारतातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या भाषांतर अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक भर हा साहित्यिक भाषांतरावर दिला जातो ज्यामध्ये रोजगाराच्या संधी अगदी नगण्य असतात. मात्र फाऊंडेशनद्वारे शिकविल्या जाणाऱ्या C-CAT अभ्यासक्रमामध्ये अंतरराष्ट्रीयीकरणाचा अविभाज्य अंग असलेल्या स्थानिकीकरणावर (Localization) सर्वाधिक भर दिलेला आहे जेणेकरून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा लक्षावधी डॉलर्सची उलाढाल होणाऱ्या लोकलायझेशनच्या क्षेत्रातील प्रवेश सुकर व्हावा. प्रकल्पाधिष्ठित अध्यापनपद्धती व एकविसाव्या शतकातील रोजगाराच्या संधींशी सुसंगत असा लोकलायझेशन अध्ययन कार्यक्रम समाविष्ट असलेला C-CAT हा संपूर्ण भारतातील एकमेवाद्वितीय भाषांतर अभ्यासक्रम आहे.
फाऊंडेशनच्या भाषांतर अभ्यासक्रमाचा अध्ययन कार्यक्रम
Certificate in Computer Assisted Translation
COURSEWORK
COMPONENT 1 - Transliteration: Devanagari Phonetic Typing (Live Project) 50 Marks
Familiarization with & mastering Google Input Tools
Accurate rendering of compound letters in Devanagari
Strategies to render unusual words
COMPONENT 2 – Proofreading OCR extracted text (Live Project) 50 Marks
Familiarization with & internalization of प्रमाणलेखन नियमावली
Developing an eye to discern minutest errors; Using OCR to extract text
COMPONENT 3 - Transcription: Transcribing audio/video (Live Project) 100 Marks
Accurate rendering of audio/video sound output into Devanagari script
Understanding & mastering international standards of transcription
COMPONENT 4 - CAT 1: Matecat & Memsource for Translation (Live Project) 200 Marks
Familiarization with Computer Assisted Translation Tools
Getting acquainted with Matecat & Memsource UI &Translation Memory (TM)
Mastering translation with Matecat & Memsource
COMPONENT 5 - CAT 2: Aegisub & Matesub for Subtitling (Live Project) 200 Marks
Mastering subtitling strategies;
Understanding the difference between video translation & subtitling
Subtitling with offline (Aegisub) and online (Matesub) subtitling tools
Total Marks: 600
Coursework designed by:
Prof. Chandrakant Kaluram Mhatre
Founder-President, Sitaram Mhatre Foundation
***जलद दुवे***
क्षणचित्र दालन
गावठाण प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी व युवा संपादकीय मंडळाच्या सभासदपदासाठी अर्ज
समाज भूषण पुरस्कार
मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती
क्षणचित्र दालन
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये C-CAT अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणारी विद्यार्थी
