मातोश्री मंजुलाबाई जेपाल स्मृती

विद्यार्थिनी सक्षमीकरण उपक्रम
आजच्या खाजगीकरणाच्या युगात इंग्रजी संभाषणाप्रमाणेच संगणक शिक्षणदेखील सधन वर्गांची मक्तेदारी बनली आहे. परिणामतः समान संधींचे गोडवे गाणाऱ्या आपल्या देशात विद्यार्थ्यांचा एक फार मोठा वर्ग संगणक प्रशिक्षणापासून वंचित राहतो आहे. ह्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने सरकारी शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. श्रमजीवी पालकांच्या ह्या मुलांसाठी संगणक शिक्षण दुरापास्त. त्यातही श्रमजीवी वर्गातल्या मुलींसाठी तर संगणक शिक्षण हे एक दिवास्वप्नच बनून राहते. त्यामुळे एकविसाव्या शतकाच्या स्पर्धा युगात ह्या मुलींसाठीची आरंभ रेषा साहजिकच इतरांच्या कोसोनकोस पाठीमागून सुरू होते! संगणक शिक्षणासारख्या ज्ञानसंपत्तीच्या ह्या विषम वाटपावर उपाय म्हणून सीताराम म्हात्रे फाऊंडेशनने "संगणक सर्वांसाठी" हा उपक्रम सुरू केला आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थीनींसाठी फाऊंडेशन निःशुल्क संगणक प्रशिक्षण वर्ग चालवते.
***जलद दुवे***
क्षणचित्र दालन
मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती
क्षणचित्र दालन