Bhakti Literature in Unicode Project
Sant Dnyandev's Amrutanubhav
Coordinator-Editor: Chandrakant Mhatre
Unicodification: Kajol Mhatre
***START OF THE PROJECT SHABDAAGAR EBOOK SANT NIVRUTTINATH GATHA***
अमृतानुभव
प्रकरण पहिले
ऐशी ही निरूपाधिके । जगाची जिये जनके ।
तिये वंदिली मिया मूळिके । देवोदेवी ।।१।।
जो प्रीयुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरी ।
चारूस्थळी एकाहारी । एकाआंगाची ।।२।।
आवडीचेनि वेगे । एकएकाते गिळिती आंगे ।
की द्वैताचेनि पांगे । उगळिते आहाति ।।३।।
जी एकचि नव्हे एकसरे । दोघा दोपण नाही पुरे ।
काय नेणो साकारे । स्वरुपे जिये ।।४।।
कैशी स्वसुखाची अळुकी । जे दोनीपण मिळूनि एकी ।
नेदेतीच कवतुकी । एकपण फुटो ।।५।।
हा ठावोवरी वियोगभेडे । जे बाळ जगायेवढे ।
वियाली परी न मोडे । दोघुलेपण ।।६।।
आपुलिये आंगी संसारा । देखिलिया चराचरा ।
परी नेदितीच तिसरा । झोक लागो ।।७।।
जया एके सत्तेचे बैसणे । दोघा एका प्रकाशाचे लेणे ।
जे अनादी एकपणे । नांदती दोघे ।।८।।
भेदु लाजोनि आवडी । एकरसी देत बुडी ।
जो भोगणया थाव काढी । द्वैताचा जेथे ।।९।।
जेणे देवे संपूर्ण देवी । जियेवीण काहीना तो गोसावी ।
किंबहुना एकोपजीवी । एकएकाची ।।१०।।
कैसा भेळु आला गोडिये । दोघे न माती जागीं इये ।
कीं परमाणूही माजी उवाये । मांडिली आहाती ।।११।।
जिहीं एकाएकावीण । न किंजे तृणाचेंही निर्माण ।
दिये दोघे जीवप्राण । जिया दोघा ।।१२।।
घरवाते मोटकी दोघे । जैं गोसावी सेजे रिघे ।
तैं दंपत्यपणे जागे । स्वामिणी जे ।।१३।।
जया दोघांमाजी एकांदे । विपायें उमजलें होय निदे ।
तरी घरवात गिळुनी नुसधें । कांहींना करी ।।१४।।
दोन्ही अंगांची आटणी । गिंवसीत आहाती एकपणीं ।
जालीं भेदाचिया वाहणी । आधाधी जियें ।।१५।।
विषो एकमेकांची जिये । जिये एकमेकांची विषयी इये।
जिहीं दोघीं सुखिये । जिये दोघे ।।१६।।
स्रीपुरुष नामभेदें । शिवपण एकलें नांदे ।
जग सगळे अधाधे - । पणें जिहीं ।।१७।।
दो दांडी एक श्रुती । दोहो फुली एक दूती ।
दोघों दिवीं दीप्ती । एकीची जेवीं ।।१८।।
दो ओंठीं एकी गोष्टी । दो डोळां एकी दृष्टी ।
तेवीं दोही जिहीं सृष्टी । एकीचि जे ।।१९।।
दाऊनि दोनीपण । एकरसाचें आरोगण ।
करीत आहे मेहूण । अनादि जे ।।२०।।
जे स्वामीचिया सत्ता । वीण असो नेणें पतिव्रता ।
जियेवीण सर्वकर्ता । काही ना जो ।।२१।।
जे कीं भातराचें दिसणें । भातारूचि जियेचें असणें ।
नेणिजती दोघेजणें । निवडूं जिये ।।२२।।
गोडी आणि गुळु । कपूर आणि परिमळु ।
निवंडू जातां पांगुळु । निवाडु होय ।।२३।।
समग्र दीप्ती घेतां । जेवि दीपचि ये होता ।
तेवी जियेचिया तत्त्वता । शिवूचि लाभे ।।२४।।
जैशी सूर्य मिरवे प्रभा । प्रभे सूर्यत्वची गाभा ।
तैशी भेद गिळित शोभा । एकाची जे ।।२५।।
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।
तैसें द्वैतमिसें एक । बरवत असे ।।२६।।
सर्व शुन्याचा निष्क । जिया बाइला केला पुरुषु ।
जेणे दादू लेन सत्ता विशेषु । शक्ती जाली ।।२७।।
जिये प्राणेश्वरीविण । शीवींहि शीवपण ।
थारो न शके ते आपण । शीवे घडली ।।२८।।
ऐश्वर्येशी ईश्वर । जियेचें अंग संसारा ।
आपण होऊनी उभारा । आपणचि जे ।।२९।।
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि अंगाचें मिरवणें ।
केलें जगायेवाडें लेणें । नामरूपाचें ।।३०।।
ऐक्याचाही दुकाळा । बहुपणाचा सोहळा ।
जिये सदैवोचिया लीळा । दाखविला ।।३१।।
अंगाचिया आटणिया । कांतु उवाया आणिला जिया ।
स्वसंकोचें प्रिया । रुढ विली जेणें ।।३२।।
जियेतें पाहावयाचिया लोभा । चढे दृष्टत्वाचिया क्षोभा ।
जियेतें न देखतुची उभा । अंगचि सांडी ।।३३।।
कांटे चि या भिडा । अवळा होये जगायेवढा ।
अंगविला उघडा । जियेवीण ।।३४।।
जो हा ठाव मंदरुपें । उबाइलेपणें हरपे ।
तो जाला जियेचेनि पडपें । विश्वरूप ।।३५।।
जिया चेवविला शीवु । वेद्याचें बोणें बहु ।
वाढीतेणेशी जेउ । धाला जो ।।३६।।
निदेलेनि भातारें । जे विये चराचरें ।
जियेचा विसावला नुरे । आंबुलेपणही ।।३७।।
जव कांत लपों बैसें । तंव नेणिजे जियोद्धेशें ।
जिये दोघे आरिसे । जिया दोघा ।।३८।।
जियेचेनि अंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे ।
सार्वभोकतृत्वाही नेघे । जियेवीण कांहीं ।।३९।।
जया प्रियेचें जें अंग । जो प्रियु जियेचें चांग ।
कालवूनि दोन्ही भाग । जेविते आहाति ।।४०।।
जैशी कां सामीरेसकट गती । कां सोनियासकट कांती ।
तैशी शीवेशी शक्ती । अवघीच जे ।।४१।।
कां कस्तूरीसकट परिमळू । क उष्मेसकट अनळु ।
तसा शक्तीशी केवळु । श्रीशीवूचि जो ।।४२।।
राती आणि दीवो । पातली सूर्याचा ठावो ।
तैसे आपुलिया साचीं वोवो । दोघे जिये ।।४३।।
किंबहुना तिये । प्रणवाक्षरीं विरूढतिये ।
दशेचीही वैरीये । शीव शक्ति ।।४४।।
हें असो नामरूपाचा भेद शिरा । गिळित एकार्थाचा उजिरा ।
नमो तया शीववोहरा । ज्ञानदेवो म्हणे ।।४५।।
जयाच्या रूपनिर्धारीं । गेली परेसी वैखरी ।
सिंधूशीं प्रलयनीरीं । गंगा जैशी ।।४६।।
जया दोघांच्या आलिंगनीं । विरोनी गेलीं दोनी ।
आघवीयाचिं रजनी । दिठीच जे ।।४७।।
वायू चाळबळेशी । जिराला व्योमाचिये कुशी ।
अटला प्रळय प्रकाशी । सप्रभभानू ।।४८।।
तेवी निहाळितां यायातें । गेले पाहणेनशी पाहते ।
पुढती घरौतें वरौतें । वंदिलीं तियें ।।४९।।
जायच्या वाहणीं । वेदकू वेद्याचें पाणी ।
न पिये पण सांडणी । आंगाचीही करी ।।५०।।
तेथ मी नमस्कारा । लागीं हों दुसरा ।
तरी लिंगभेद पऱ्हा । जोडूं जावो ।।५१।।
परी सोनेनसी दुजें । नव्हतु लेणें सोना भजे ।
हें नमन करणें माझें । तैसें आहे ।।५२।।
सांगता वाचेतें वाचा । ठावो वाच्यवाचकाचा ।
पडतां काय भेदाचा । विटाळु होय ।।५३।।
सिंधु आणि गंगेची मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।
दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ।।५४।।
पाहें पा भास्य भासकता । आपुलां ठाई दाविता ।
एकपण काय सविता । मोदितसे ।।५५।।
चांदाचिया दोंदावरी । होता चांदणियाची विखुरी ।
काय उणें दीप्तीवारी । गिंवसोपा दीपु ।।५६।।
मोतियाची किळ । होय मोतीयावरी पांगुळ ।
अगळे निर्मळ । रूपा ये की ।।५७।।
मात्राचिया त्रिपुटिया । प्र ण वू काय केला चिरटिया ।
कीं णकर ती रेघटिया । भेदवला काई ।।५८।।
आहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभ मिळे ।
तरी स्वतरंगाचीं मुकुळें । तुरांबु कां पाणी ।।५९।।
म्हणोनि भूतेशु भवानी । वंदिलीं न करोनि सिनानीं ।
मी निघालों नमनी । तें हें ऐसें ।।६०।।
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबी रिगे ।
कां बुडी दिजे तरंगे । वायूचा ठेला ।।६१।।
नातरी नीदजात खेवो । पावे आपुली ठावो ।
तैशी बुद्धित्यागें देवी देवो । वंदिलीं मिया ।।६२।।
सांडूनि मोठपणाचा लोभु । मिठें सिंधुत्त्वाचा घेतला लाभु ।
तेवी अहं देऊनि मी शंभु । शांभवी जालों ।।६३।।
शिवशक्ति समावेशे । नमन केले म्यां ऐसें ।
रंभागर्भ आकाशे । रिघाला जैसा ।।६४।।

